युवतींच्या दहीहंडी उत्सव समितीच्या अध्यक्षपदी डॉ. सिमा पाटील

On: August 19, 2026 7:20 PM

जळगाव – भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन व युवाशक्ती फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, दि. ५ सप्टेंबर २०२६ रोजी शिवतीर्थ मैदान येथे युवतींची दहीहंडी आयोजित करण्यात आली आहे. दहिहंडी फोडणाऱ्या युवतींच्या प्रथम विजेत्या संघाला ३११११ रूपये, द्वितीय संघाला २११११ रूपये, तृतीय संघाला १११११ रूपये रोख पारितोषिके देण्यात येणार आहे. युवतींच्या दहीहंडीचे यंदा १८ वे वर्ष असून दहिहंडी सारख्या मोठ्या उत्सवात पुरूषांप्रमाणे युवतींचा सहभाग वाढावा व त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळावे या उद्देशाने ही दहींहंडी सुरू करण्यात आली आहे. मानवी मनोरे बनविणे या क्रीडा प्रकाराला महाराष्ट्र शासनातर्फे साहसी खेळाचा दर्जा देण्यात आला आहे. संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात ही एकमेव युवतींची दहीहंडी साजरी होत असते.

सदर दहीहंडी उत्सवाची समिती गठीत करण्यात आली असून समितीच्या अध्यक्षपदी डॉ. सीमा पाटील, उपाध्यक्षपदी उषा जैन, कार्याध्यक्षपदी डॉ. सोनाली महाजन, स्वागत समिती प्रमुख डॉ. कल्याणी नागूलकर व सचिवपदी प्रा. क्षमा सराफ यांची निवड करण्यात आली आहे. 

सदर कार्यकारीणी पुढीलप्रमाणे – खजिनदार निलम जोशी, स्वागत समिती सदस्य रूपाली वाघ, सदस्य म्हणून डॉ. अनिता पाटील, हर्षाली चौधरी, नेहा जोशी, सोनाली पाटील, लेफ्टनंट डॉ. हेमाक्षी वानखेडे, संध्या कांकरिया, मिनल जैन यांची या असतील. युवतींची दहिहंडी उत्सव समितीच्या नविन कार्यकारिणीने ‘ठेवूया संस्कृतीची जाण, वाढवू आपल्या उत्सवाची शान’ या टॅगलाईन चे पोस्टर अनावरण केले. 

‘युवतींनी युवतींसाठी आयोजित केलेली दहिहंडी हा अत्यंत कौतुकास्पद आणि प्रेरणादायी उपक्रम आहे. महिलांनी पुढाकार घेऊन महिलांसाठी व्यासपीठ निर्माण करणे ही निश्चितच सकारात्मक बाब  आहे. त्यांच्या या उत्साहाला प्रोत्साहन देणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. अशा उपक्रमामधून युवतींच्या आत्मविश्वाला बळ मिळते आणि समाजात महिला नेतृत्वाची नवी दिशा निर्माण होते.’ – अशोक जैन, अध्यक्ष जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment