गावठी कट्टा आणि जिवंत काडतुसासह एकास अटक

On: August 20, 2026 7:24 PM

जळगाव : रावेर पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने गावठी कट्टा आणि दोन जिवंत काडतुसासह एकास अटक केली आहे. कृष्णा दत्तु पाटील असे अटक करण्यात आलेल्या विस वर्ष वयाच्या तरुणाचे नाव आहे. रावेर येथील छोरीया मार्केट परिसरातून त्याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याविरुद्ध रितसर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाई सुरु आहे.   

पोलिस अधिक्षक श्रीकांत धिवरे,  अप्पर पोलिस अधिक्षक संदीप गावीत आणि डिवायएसपी अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली रावेर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संदीप पाटील व त्याचे सहकारी सहायक पोलिस निरीक्षक हरीदास बोचरे, पो.हे.कॉ समाधान ठाकुर, पो. कॉ. सुकेश तडवी, श्रीकांत चव्हाण, विकार शेख, प्रमोद पाटील, विशाल पाटील, संभाजी बिजागरे आदींनी या कारवाईकामी सहभाग घेतला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment