जळगाव बसस्थानकातील चोरीचा उलगडा

On: August 24, 2026 9:28 PM

जळगाव : जळगाव बस स्थानकातील चोरीचा उलगडा करण्याकामी जिल्हापेठ पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाला यश आले असून दोघा सराईत महिलांना ताब्यात घेण्यात आले आहे. ताब्यातील दोघा महिलांकडून एक लाख पाच हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.

दि. १८ जुलै २०२६ रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास जळगाव येथील नवीन बसस्थानकातून जळगाव ते चाळीसगाव जाणाऱ्या बसमध्ये फिर्यादी महिला चढत असताना गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने त्यांच्या पर्समधून सोन्याचे दागिने लंपास केले होते. यामध्ये सुमारे १० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मणी-मंगळसूत्र आणि सुमारे ६ ग्रॅम वजनाचे कानातील सोन्याचे टोंगल, असे एकूण ४५ हजार रुपये किमतीचे दागिने चोरीला गेले होते. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल वाघ यांना गुन्ह्याचा सखोल तपास करून आरोपींचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पोलीस पथकाने घटनास्थळाची पाहणी करून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. तसेच गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे तपासाची दिशा निश्चित करण्यात आली.

तपासादरम्यान पोलिसांनी उषा विजय ससाणे (वय ४८, रा. नारायणवाडी, इंदिरानगर, ता. चाळीसगाव, जि. जळगाव, सध्या रा. हरिविठ्ठल नगर, जळगाव) आणि अनिता विजय ससाणे (वय ३५, रा. राजीव गांधी नगर, वाघ नगर, जळगाव) या दोन्ही महिला आरोपींना ताब्यात घेतले. दोघा महिलांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यातील गुन्ह्यासह जळगाव शहर पोलीस ठाण्यातील आणखी दोन गुन्ह्यांची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

तपासादरम्यान दोन्ही महिला आरोपींचा पूर्वीचा गुन्हेगारी रेकॉर्डही समोर आला. त्यांच्याविरुद्ध अमळनेर पोलीस ठाणे, जळगाव शहर पोलीस ठाणे आदी ठिकाणी गुन्हे दाखल असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे पोना संतोष सोनवणे करत आहेत.

पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक तथा प्रभारी अधिकारी अनिल वाघ यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. कारवाईत पोहेकॉ गणेश शिरसाठ, पोहेकॉ नरेश सोनवणे, पोहेकॉ महेंद्र पाटील, पोहेकॉ किरण वानखेडे, तेजस मराठे, पोलीस कॉन्स्टेबल कमलाकर बडगुजर, प्रशांत सैंदाणे, अजय अहिरे, पोलीस कॉन्स्टेबल अजय सपकाळे, नरेंद्र दिवेकर, महिला पोलीस कॉन्स्टेबल वैशाली सोनवणे, महिला पोलीस कॉन्स्टेबल सुषमा ढमढेरे, तसेच नेमणुकीवरील इतर पोलिस कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment