चोरीच्या तिन मोटार सायकलींसह चोरटा जेरबंद

On: August 24, 2026 9:44 PM

जळगाव : चोरीच्या तिन मोटार सायकलींसह अट्टल चोरट्यास एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने जेरबंद केले आहे. त्याच्याकडून चोरीच्या तिन मोटार सायकली जप्त करण्यात आल्या आहेत. अयोध्या नगर परिसरातील रहिवाशाची मोटार सायकल चोरी प्रकरणी दाखल गुन्ह्याच्या तपासात चोरटा पोलिसांच्या हाती लागला आणि इतर गुन्ह्यांचा देखील उलगडा झाला आहे.

मोहम्मद शहा अस्लम शहा असे भुसावळ येथून ताब्यात घेण्यात आलेल्या मोटार सायकल चोरट्याचे नाव आहे. त्याच्याकडून एमआयडीसी पोलिस स्टेशनला दाखल गुन्ह्यातील मोटार सायकल हस्तगत करण्यात आली. त्यानंतर त्याच्याकडून इतर गुन्ह्यातील चोरीच्या दोन मोटार सायकली देखील काढून दिल्या आहेत.   

पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके, श्रेणी पो. उपनिरीक्षक विजयसिंग पाटील, पो.हे.काँ गिरीष पाटील, पो.हे.काँ किरण चौधरी, पो.हे.काँ प्रमोद लाडवंजारी, पो.काँ विशाल कोळी, पो.काँ योगेश घुगे आदींच्या पथकाने या गुन्ह्याच्या तपासकामी सहभाग घेतला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment