आंतर जिल्हा १९ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेसाठी निवड चाचणी 

On: August 25, 2026 6:53 PM

जळगाव –  महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने घेण्यात येणाऱ्या आंतर जिल्हा मुलांच्या क्रिकेट स्पर्धेसाठी जळगाव जिल्हा मुलांचा संघ निवडण्यासाठी निवड चाचणीचे आयोजन रविवार, दि. ३० ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ०९ वाजता अनुभूती निवासी स्कूलच्या मैदानावर (शिरसोली रोड जळगाव )  येथे आयोजित  केले आहे.

ज्या मुलांचा जन्म दिनांक ०१.०९.२००८ रोजी वा त्या नंतरचा असेल तेच मुले या निवड चाचणीसाठी पात्र असतील. सर्व इच्छुक मुलांनी या निवड चाचणीत जास्तीत जास्त संख्येने आपला सहभाग दिलेल्या लिंक https://forms.gle/ERJRwScsrP1uqtL46 वर जाऊन गुगल फॉर्म भरून नोंदवावा. सोबत आपले आधार कार्ड व जन्म दाखला अपलोड करावा.  निवड चाचणी साठी क्रिकेट साहित्यासह पांढरा गणवेश व शूज ओरिजनल जन्म दाखला व आधार कार्ड सोबत आणावे, असे आवाहन जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन  यांनी केली आहे.

अधिक माहितीसाठी सचिव अरविंद देशपांडे (९४०४९५५२०५) व सहसचिव अविनाश लाठी (९८२२६१६५०३ ) यांचेशी संपर्क साधावा. सर्व खेळाडूंना विशेष सुचना आहे की त्यांनी आपला फॉर्म ऑनलाइन भरावे व निवड चाचणी फी १०० रुपये कॅश सुरूपात निवड चाचणीचे दिवशी ग्राऊंडवर येऊन भरावे ज्या खेळाडूंनी ऑनलाइन फॉर्म भरलेला नसेल, त्यांना प्रवेश मिळणार नाही ही निवड जळगाव जिल्ह्याचे खेळाडूंसाठी आहे इतर जिल्ह्याचे खेळाडूंना प्रवेश मिळणार नाही.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment