तोंडापूर येथे जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धा

On: September 11, 2026 6:34 PM

 जळगाव : स्व. कासम शेख यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ जळगाव जिल्हा कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने तोंडापूर येथे जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेचे उद्घाटन २६ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता होणार आहे.

स्पर्धेतील विजेत्यांना एकूण १४ हजार रुपयांची रोख बक्षिसे देण्यात येणार आहेत. पारितोषिकांसाठी ज्ञानेश्वर पाटील, शरद पवार, दत्तात्रय रामदास कानडजे, नाटूबा जाधव, जया फोटो, सलमान गयास शेख, जमील पठाण तसेच मुक्ताई कृषी केंद्र, तोंडापूर यांनी मोलाचे सहकार्य आहे. जिल्ह्यातील कॅरमपटूंनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. स्पर्धेचे नियोजन प्रमुख आयोजक रंगनाथ पाटील करीत असून, मंजूर खान व राष्ट्रीय विजेते सैय्यद मोहसिन यांचे मार्गदर्शन लाभत आहे. स्थानिक कॅरमपटूंना व्यासपीठ उपलब्ध करून देतानाच स्व. कासम शेख यांच्या कॅरम क्षेत्रातील योगदानाच्या स्मृती जागविणे, हा स्पर्धेचा उद्देश आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment