प्रेयसीच्या पतीवर प्राणघातक हल्ला

On: September 21, 2026 8:56 AM

जळगाव – विवाहीत प्रेयसीने आपल्यासोबत बोलणे बंद केल्याच्या रागातून तिच्या घरात घुसून तिच्या पतीवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना जळगाव नजीक एका गावात घडली. या घटने प्रकरणी प्रियकरासह त्याच्या साथीदाराविरुद्ध एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विवाहीत प्रेयसीने प्रियकरासोबत बोलणे बंद केले होते. पुर्वी नियमीत बोलणारी प्रेयसी आता बोलत नसल्यामुळे प्रियकर स्वप्नील राजेंद्र पाटील याने त्याचा साथीदार धिरज खंडाळकर याच्या मदतीने प्रेयसी विवाहीतेच्या पतीवर कटर व कात्रीने हल्ला करुन त्याला मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या पतीला शासकीय रुग्णालयात वैद्यकीय उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. संबंधित विवाहीतेने दिलेल्या फिर्यादीनुसार दाखल गुन्ह्याचा अधिक तपास सुरु आहे.     

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment