जळगाव – जैन इरिगेशनच्या माध्यमातून जळगाव शहराच्या काव्यरत्नावली चौकात गणेशोत्सवाच्या पार्श्वभुमीवर आकर्षक सजावट करण्यात आली आहे. जैन इरिगेशनच्या माध्यमातून या चौकात विविध सण आणि उत्सवाच्या पार्श्वभुमीवर आकर्षक देखावा, सजावट केली जाते. गणेशोत्सवानिमीत करण्यात आलेली सजावट जळगावकरांच्या आकर्षणाचे माध्यम ठरत आहे.
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांची संकल्पना आणि त्यांच्या कला विभागातील सहका-यांच्या परिश्रमातून साकारण्यात आलेली ही सजावट निश्चीतच उल्लेखनीय ठरली आहे. देशातील विविध प्रसिद्ध गणरायांच्या प्रतिकृतींचे दर्शन या निमीत्ताने होत आहे. या सजावटीमुळे या चौकात श्रद्धा आणी भक्तिभावाचे आगळे वेगळे वातावरण या निमीत्ताने झाले आहे. कला आणि भक्तीचा एक सुरेख संगम देखील या निमित्ताने बघण्यास मिळत आहे.






