जळगाव : जळगाव बस स्थानकात उभ्या असलेल्या प्रवाशाकडील 21 हजार रुपये हिसकावणा-या सराईत गुन्हेगारास जिल्हा पेठ पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने जेरबंद केले आहे. भिकन पंडीत शर्मा असे अटक करण्यात आलेल्या पारोळा येथील रहिवासी चोरट्याचे नाव आहे. त्याच्याकडून सोळा हजार रुपये जप्त करण्यात आले आहे. भिकन शर्मा याच्याविरुद्ध जिल्हा पेठ पोलिस स्टेशन व्यतिरिक्त चोपडा आणि पारोळा पोलिस स्टेशनला प्रत्येकी तिन गुन्हे दाखल आहेत.
सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिस पथकाने त्याला जळगाव बस स्थानका नजीक असलेल्या भजे गल्ली परिसरातून ताब्यात घेण्यात आले. पोलिस निरीक्षक शरद शेवाळे यांच्या पथकातील सहायक पोलिस निरीक्षक अनिल वाघ, हे.कॉ. महेश महाजन, नरेश सोनवणे, तेजस मराठे, दिपक पाटील, प्रविण जाधव, समाधान पाटील, प्रशांत लाड, कमलाकर बागुल, अजय अहिरे यांच्या पथकाने या कामगिरीत सहभाग घेतला.







