शालेय राज्य स्पर्धेसाठी जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशनच्या  खेळाडूंची निवड

On: September 30, 2026 6:49 PM

जळगाव दि. २९ प्रतिनिधी – क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक, यांच्या सहकार्याने विभागीय क्रीडा संकुल, नाशिक येथे शालेय विभागीय तायक्वांडो स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशनच्या १९ वर्षे आतील मुलींमध्ये देवयानी भिला पाटील, कोमल गाढे, १९ वर्षे आतील मुलांमध्ये  सोहम कोल्हे, विवेक तोरे, १७ वर्षे आतील मुलांमध्ये रोशन गाढे, पार्थ माळी, अमर  शिवलकर या खेळाडूंनी सुवर्णपदक पटकावले.

त्यांची अकोला येथे होणाऱ्या शालेय राज्य स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले आहे. त्यांना मुख्य प्रशिक्षक अजित घारगे, सह प्रशिक्षक जयेश बावीस्कर, निकेतन खोडके, जयेश कासार, जिवन महाजन, श्रेयांग खेकारे, पुष्पक महाजन, निकिता पवार यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले. त्यांच्या यशाबद्दल संघटनेचे अध्यक्ष अतुल जैन, उपाध्यक्ष ललित पाटील, कोषाध्यक्ष सुरेश खैरनार, सहसचिव रवींद्र धर्माधिकारी, सचिव अजित घारगे, सदस्य नरेंद्र महाजन, कृष्णकुमार तायडे, सौरभ चौबे, महेश घारगे, तसेच जैन स्पोर्टस् अकॅडमी चे अरविंद देशपांडे यांनी कौतुक केले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment