64 ग्रॅम अमली पदार्थ बाळगणारा जेरबंद

On: October 2, 2026 11:28 AM

जळगाव : जळगाव तालुका पोलिस स्टेशन हद्दीत पाळधी तरसोद बायपास लगत असलेल्या कचरा फॅक्ट्री परिसरात 64.44 ग्रॅम वजनाचा एम. डी. अंमली पदार्थ बाळगणा-यास जेरबंद करण्यात आले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली असून फरार दोघा संशयीत इसमांचा शोध जारी आहे. “नशामुक्त भारत अभियान” अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांना समजलेल्या माहितीच्या आधारे ही प्रभावी कारवाई करण्यात आली.

अजय बिरजू गारुंगे असे अटक करण्यात आलेल्या एम डी पदार्थ बाळगणा-याचे नाव आहे. त्याच्याकडून 1 लाख 93 हजार 320 रुपये किमतीचा 64.44 ग्रॅम वजनाचा पदार्थ आणि 20 हजार रुपये किमतीचा मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अजय गारुंगे हा पोलिसांच्या अभिलेख्यावरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध यापुर्वी एमडी अंमली पदार्थ बाळगणे, विक्री करणे, गांजा बाळगणे/विक्री करणे, घरफोडी अशा गंभीर स्वरूपाचे 35 गुन्हे दाखल आहेत.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक राहुल गायकवाड यांचे नेत्तृत्वात पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील, पोलीस उप निरीक्षक सोपान गोरे, पोलीस उप निरीक्षक विजय देवराम पाटील, सहायक फौजदार अतुल वजांरी, पोहेकॉ अकरम शेख, किशोर पाटील, प्रविण भालेराव, मुरलीधर धनगर, पोकॉ रविंद्र कापडणे, गोपाळ पाटील, प्रदिप सपकाळे, राहुल रगडे, छगन तायडे तसेच तांत्रिक मदत पोकॉ मिलीद जाधव, गौरव पाटील आदींच्या पथकाने या कारवाईत सहभाग घेतला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment