किरकोळ कारणावरुन तरुणास मारहाण

On: September 25, 2020 8:49 PM

जळगाव : किरकोळ कारणावरुन तरुणाला मारहाण केल्याप्रकरणी जळगाव तालुका पोलिस स्टेशनला आज गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रोहित रतन पवार रा. खोटे नगर याने संशयीत आरोपी महेश उर्फ डेम्या वासुदेव पाटील या तरुणाविरोधात  फिर्याद दाखल केली आहे. संशयित आरोपी महेश उर्फ डेम्या वासुदेव पाटील याने गुरुवारी सायंकाळी साडे सात वाजेच्या सुमारास आव्हाणे शिवारात म्हटले की ज्या मुलांसोबत माझे पटत नाही त्या मुलांसोबत असतांना तु मला हाताने इशारे करत जावू नको. त्यामुळे आमच्यात काही वाद निर्माण झाल्यास त्याला तु जबाबदार राहशील. या किरकोळ कारणावरुन दोघात भांडण झाले.

संशयीत महेश पाटील याने दारुच्या नशेत रोहित पवार यास मारहाण करुन त्याच्या डाव्या बोटाला चावा घेत दुखापत केली. संशयीत महेश पाटील हा वैद्यकीय उपचारार्थ दवाखान्यात दाखल असल्यामुळे त्याला अटक झालेली नाही. पुढील तपास हे.कॉ. उमेश भांडारकर करत आहे.   

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment