सांगलीच्या कोविड सेंटरमधून दोघा कैद्यांचे पलायन

On: September 27, 2020 2:03 PM

सांगली : सांगली शहरातील लठ्ठे एज्युकेशन सोसायटीच्या वसतिगृहातील कोविड सेंटरमधून दोन कैद्यांनी आज पलायन केले. राजू कोळी आणि रोहित जगदाळे (काळी वाट, हरिपूर) अशी पलायन केलेल्या कैद्यांची नावे आहेत.

गेल्या आठवड्यात या दोघा कैद्यांना एका गुन्ह्यात अटक झाली होती. दोन दिवसांच्या पोलिस कोठडीननंतर त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती. कोठडीत ठेवण्यापुर्वी वैद्यकीय तपासणी अंती त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाले होते. त्यामुळे दोघांना लठ्ठे एज्युकेशन सोसायटीच्या वसतिगृहातील कैद्यांसाठी असलेल्या सेंटर मध्ये ठेवण्यात आले होते.

आज रविवारी पहाटेच्या वेळी कैद्यांची मोजणी सुरु असतांना हा पलायनाचा प्रकार उघडकीस आला. त्यांचा शोध सुरु आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment