तलवारीच्या बळावर दहशत माजवणा-यास भुसावळला अटक

On: September 27, 2020 9:25 PM

जळगाव : भुसावळ शहरातील घोडेपीर बाबा दर्गा परिसरात तलवारीच्या बळावर दहशत माजवणा-या तरुणास भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेत अटक केली आहे. त्याच्या ताब्यातून लोखंडी तलवार हस्तगत करण्यात आली आहे.

आज रविवार 27 सप्टेबर रोजी सायंकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास निलेश उर्फ गोलू जय सपकाळे (22) रा.शिरपूर कन्हाळा ता.भुसावळ हा त्याच्या कब्जातील तलवारीच्या बळावर दहशत माजवत असल्याची माहिती पोलिस निरिक्षक दिलीप भागवत यांना मिळाली. त्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे लागलीच डी.बी.पथकाच्या मदतीने त्याला शिताफीने तलवारीसह ताब्यात घेत अटक करण्यात आली आहे.

अटकेतील निलेश उर्फ गोलू जय सपकाळे याच्याविरुद्ध भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनला आर्म अ‍ॅक्ट कलम 4/25 नुसार कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईत उप विभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड व पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अनिल मोरे, मंगेश गोटला,पो.हे.काॅ.अयाज सैय्यद, पो.ना.किशोर महाजन, रमण सुरळकर,समाधान पाटील, उमाकांत पाटील, पो.काॅ. विकास सातदिवे, ईश्वर भालेराव, प्रशांत परदेशी, योगेश महाजन, कृष्णा देशमुख यांनी सहभाग घेतला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment