उत्तर प्रदेशातील हाथरस येथे 15 दिवसांपूर्वी अजून एका 19 वर्षीय निर्भयावर चौघा नराधमांनी सामूहिक अत्याचार केला होता. अत्याचारानंतर या नराधमांनी तिची जीभ देखील कापली. गंभीर अवस्थेत वैद्यकीय उपचार घेत असलेल्या या पिडीत तरुणीने आज अखेरचा श्वास घेत आपली जीवनयात्रा संपवली.
पीडित तरुणी १४ सप्टेंबर रोजी चौघा नराधमांच्या सामूहिक अत्याचाराला बळी पडली होती. अलीगडच्या सफदरजंग हॉस्पिटलमध्ये ती उपचार घेत होती.
चौघा नराधमांनी पीडितेवर केवळ अत्याचारच केला नाही तर तिची मान मोडली, पाठीचे हाड मोडले व तिची जीभ देखील कापली. जिभ कापलेल्या अवस्थेत तिला पोलिसांना जवाब देणे कठीण झाले होते. तरी देखील तिने आपले धैर्य सोडले नाही.
१४ सप्टेंबर रोजी झालेल्या घटनेनंतर, १९ सप्टेंबरला पीडितेचे जवाब घेण्यासाठी पोलिस तिच्याजवळ आले होते. त्यावेळी ती घाबरुन बेशुद्ध झाली होती. त्यावेळी तिचा जवाब घेता आला नाही. 22 सप्टेंबरला पुन्हा पोलीस जेएन मेडिकल कॉलेजमध्ये तिचा जवाब घेण्यासाठी आले. त्यावेळी तिने केवळ इशा-याचा आधार घेत आपला जवाब दिला.
पोलिसांनी याप्रकरणी चौघा नराधमांविरोधात बलात्काराचे कलम वाढवून त्यांना अटक करण्यात आली. जबाब घेणाऱ्या अमंलदाराने त्याच्या वरिष्ठ अधिका-यांना पाठवलेल्या दोन पानी दोन अहवालात ही माहिती समोर आली आहे.
जवाब घेतांना पिडीतेची जीभ कापली गेली होती. तिची मान देखील तुटली होती. तिची अवस्था बघून तिचा जवाब घेणारे पोलिस पथक देखील काही क्षण भाऊक झाले होते. ती बोलू शकत नव्हती. चंदपा परिसरात घडलेल्या या घटनेचा तपास सुरु आहे.