आता बडे अभिनेते एनसीबीच्या निशान्यावर

On: September 29, 2020 10:08 PM

मुंबई : सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणातून सरकलेला तपास एनसीबीच्या टप्प्यात येवून ठेपला आहे. बॉलीवूडच्या ड्रग्ज कनेक्शनच्या माध्यमातून आतापर्यंत मृत सुशांतसिंग राजपूत व्यतिरिक्त अभिनेत्रींची नावे समोर आली आहेत.

त्यापैकी अभिनेत्री रिया चक्रवर्ती सध्या भायखळ तुरुंगात आहे. दीपिका पदुकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खान आणि रकुलप्रित सिंह यांची चौकशी सुरु आहे. लवकरच अन्य अभिनेत्रींविरुद्ध देखील कारवाईची शक्यता वर्तवली जात आहे.यासह आता बॉलिवूडमधील काही अभिनेत्यांची नावे उघडकीस आली असून ते देखील एनसीबीच्या निशान्यावर आले आहेत.

एनसीबीने आपल्या तपासाची मर्यादा वाढवली आहे. त्यामुळे आता बॉलिवूडच्या काही अभिनेत्यांची देखील अडचण वाढणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार तिन बडे अभिनेते एनसीबीच्या टप्प्यात आले आहेत. या बड्या अभिनेत्यांच्या चौकशीकडे बॉलीवुडचे लक्ष लागले आहे. दरम्यान तपास सुरु असतांना एनसीबीच्या काही अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे पुढील तपासकामी दोन ते तिन जणांची नवीन टीम बोलावण्यात आली आहे.

एनसीबी आगामी काळात अभिनेत्यांना समन्स बजावण्याची शक्यता आहे. बॉलिवूडचे हे ए-लिस्टर अभिनेते असून त्यांनी सुरु असलेल्या चौकशीतील अभिनेत्रींसोबत पार्टीत सहभाग घेतला होता. या हाय प्रोफाईल पार्टीत ड्रग्ज सेवन केल्याचे पुरावे हाती लागल्यास एनसीबी या अभिनेत्यांना देखील समन्स बजावण्याची शक्यता आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment