युवासेना पदाधिका-याचा पुण्यात खून

On: October 2, 2020 10:30 AM

पुणे : विद्येचे माहेरघर असलेले पुणे दररोज गाजत आहे. शिवसेना युवा सेनेचे कसबा विभाग प्रमुख दीपक विजय मारटकर यांची मध्यरात्री ५ ते ६ जणांकडून तीक्ष्ण हत्याराने खून झाल्याची घटना घडली. या घटनेने शहराच्या मध्य वस्तीत तणावाची स्थिती निर्माण झाली असली तरी पोलिस बंदोबस्तामुळे परिस्थिती नियंत्रणात आहे. राजकीय वैमनस्यातून ही हत्या झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी दोघांना चौकशीकामी ताब्यात घेण्यात आले आहे

दीपक विजय मारटकर हे मध्यरात्री साडेबारा वाजेनंतर जेवण आटोपून घराच्या बाहेर बसले होते. त्याचवेळी ५ ते ६ जणांचे टोळके तीक्ष्ण हत्यारासह त्यांच्या दिशेने चाल करुन आले. घराबाहेर बसलेले दीपक मारटकर यांच्यावर तिक्ष्ण हत्याराचे सपासप वार केल्यानंतर सर्वजण पळून गेले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दीपक मारटकर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरु असतांना पहाटे चार वाजेच्या सुमारास त्यांचे निधन झाले.

राजकीय वैमनस्यातून हा खूनाचा प्रकार झाला असल्याचा पोलिसांना संशय असून त्या दृष्टीने तपास सुरु आहे. याप्रकरणी दोघा संशयीतांना ताब्यात देखील घेण्यात आले आहे.
पुणे मनपाच्या निवडणूकीत दीपक मारटकर उभे होते़ त्यावेळी त्यांच्याविरुद्ध अश्विनी कांबळे या देखील उमेदवार म्हणून निवडणूकीच्या रिंगणात उभ्या होत्या. शिवसेनेचे महेंद्र सराफ हे देखील तिकीट मिळविण्यासाठी इच्छुक उमेदवार होते. मात्र त्यांना शिवसेनेकडून त्यांना तिकीट नाकारण्यात आले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment