चाळीसगावच्या तरुणाचा चांदवड नजीक अपघाती मृत्यू

On: June 20, 2020 3:09 PM

जळगाव :  नाशिक जिल्हयातील चांदवड नजीक मुंबई आग्रा महामार्गावरील राहुड तलावाजवळ दुचाकी चालक तरुणाचा काल सायंकाळी अपघाती मृत्यू झाला आहे. सदर तरुण जळगाव जिल्हयाच्या चाळीसगाव शहरातील हिरापूर रस्त्यावरील रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले आहे. लांब पल्ल्याचा प्रवास करणा-या या तरुणास अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाच्या डोक्यात हेल्मेट नव्हते.

अक्षय संजय जोशी रा. हिरापूर रोड चाळीसगाव असे मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाचे नाव असून त्याच्य दुचाकीचा क्रमांक एमएच 19 डीएल 5804 असा आहे. तो ज्युपिटर वाहन चालवत होता. मयत अक्षय हा नाशीक रोड नजीक जुन्या विजय ममता टॉकीज परिसरात रहात होता. त्याला उप जिल्हा रुग्णालयत दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले. घटनेची माहिती  मिळताच स.पो.नि. पाटील व पोलिस कर्मचा-यांनी धाव घेत पुढील मदतकार्य केले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment