चारित्र्याच्या संशयातून पत्नीची हत्या

On: October 4, 2020 8:44 PM

नांदुरा : बुलढाणा जिल्ह्याच्या नांदुरा तालुक्यातील जिगाव येथे मद्यपी पतीने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिला कु-हाडीने ठार केल्याची घटना घडली. घटनेनंतर मृतदेहाची दुर्गंधी शेतात पसरल्याने या घटनेला आज सकाळी वाचा फुटली.

समाधान तायडे हा मद्यपी पती त्याच्या पत्नीच्या चारित्र्यावर नेहमी संशय घेत असे. या संशयातून त्याने काल पत्नी जाईबाई हिच्यावर कु-हाडीचे वार करुन तिला जिवे ठार केले. आज सकाळी या मृतदेहाची दुर्गंधी परिसरात पसरली. त्यामुळे या घटनेची वाच्यता झाली.

आरोपी समाधान तायडे याचा मुलगा संघपाल समाधान तायडे याने दिलेल्या फिर्यादीनुसार नांदुरा पोलिस स्टेशनला खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी त्यांना महिलेचा मृतदेह आढळून आला. मयत महिलेची ओळख पटली असून पोलिसांनी आरोपी पती समाधान यास अटक केली आहे. पुढील तपास नांदुरा पोलिस करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment