जळगाव : जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पाचोरा पोलिस पथकाच्या मदतीने आज पाचोरा परिसरातून जिवंत काडतुसे जप्त केली.
मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पाचोरा येथील जळगांव चौफुली ते जामनेर रत्यावर सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. या मार्गावर संशयीत इंडिगो कार अडवून वाहन चालक सागर निवृत्ती गांगुर्डे (२९) रा. शिरुर, ता. चांदवड जि. नाशिक, सागर वांजोळे (२३) रा. शिरुड, ता. चांदवड, जि. नाशिक, अमोल रमेश बुल्हे (२५) रा. शिरसगाव लौकी, ता. येवला जि. नाशिक, राहुल विठ्ठल कराळे (२५) रा. शिरेगाव ता. गंगापुर, जि. औरंगाबाद, देवचंद जगताप (२४) रा. मरळगोई ता. निफाड, जि. नाशिक अशा सर्वांना ताब्यात घेण्यात आले.
त्यांची त्यांच्या ताब्यातील वाहनासह झडती घेतली असता त्यांच्याकडे गावठी कट्ट्यासह ५ जिवंत काडतुसे, ७ मोबाईल, इंडिगो गाडी असा जवळपास ५ लाख ४५ हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
स्थानिक गुन्हे शाखेचे स.पो.नि. स्वप्निल नाईक, पोहेकॉ. विलास पाटील, दत्तात्रय बडगुजर, पोलिस नाईक विजय पाटील, नंदलाल पाटील, सचिन महाजन, भगवान पाटील, सोपान पाटील, गनी तडवी, श्रीकांत ब्राम्हणे तसेच पाचोरा पोलिस स्टेशनचे कर्मचारी राहुल बेहरे, किरण पाटील आदींनी या कारवाईत सहभग घेतला. पुढील तपास पाचोरा पोलिस करत आहेत.