नागपूरात वेश्यावस्तीवर छापा – 16 महिलांसह 12 पुरुष ताब्यात

On: October 6, 2020 3:31 PM

नागपूर : देशाची उपराजधानी नागपूर शहरात सर्वात मोठ्या वेश्या वस्तीवर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. लकडगंज पोलिसांनी शहरातील गंगाजमुना वेश्यावस्तीवर छापा टाकून कारवाई केली आहे. या छाप्यात16 महिलांसह 12 ग्राहकांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नागपूर शहरातील गंगा-जमुना परिसरात मोठ्या प्रमाणात देहविक्रीचा अड्डा समजला जातो. या ठिकाणी वेश्या महिला रस्त्यावर उभ्या राहून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी तत्पर असतात. या प्रकारामुळे परिसरातील लोकांना प्रचंड मनस्ताप होत असतो.

या परिसरात सर्वाधिक वारांगणा काश्मिरी गल्लीत राहतात. कोरोनाच्या कालावधीत बंद असलेला हा व्यवसाय आता पुन्हा नव्याने सुरु झाला आहे. हा व्यवसाय सुरु होताच पुन्हा नव्या जोमाने या परिसरात ग्राहकांची गर्दी वाढू लागली आहे. त्यामुळे परिसरातील रहिवासी महिलांना रस्त्याने जाता येतांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते.

या सर्व पार्श्वभुमीवर सोमवारी उशिरा रात्री गंगाजुमना या वेश्यावस्ती परिसरात पोलिसांनी छापा घातला. यावेळी 16 महिला व 12 ग्राहकांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याविरुद्ध रितसर गुन्हा दाखल करण्यात आला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment