डॉ. नीलाभ रोहन यांच्या जागी कुमार चिंथा

On: October 7, 2020 9:38 PM

जळगाव : जळगाव पोलिस उपविभागाचे सहायक पोलिस अधिक्षक डॉ. नीलाभ रोहन यांची प्रतिक्षीत असलेली बदली अखेर आज बुधवार 7 ऑक्टोबर रोजी झाली. त्यांच्या जागी अगोदर भुसावळचा तात्पुरता पदभार घेणारे आयपीएस अधिकारी कुमार चिंथा यांची नेमणूक झाली आहे.

जळगाव जिल्ह्याचे पुर्वीचे पोलिस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले यांना व आता डॉ. नीलाभ रोहन यांना देखील अद्याप नविन नियुक्तीचे ठिकाण मिळालेले नाही.
कुमार चिंथा यांची सुरुवातीला अमळनेर उप विभागात, त्यानंतर भुसावळ उप विभागात नेमणूक झाली होती. आता त्यांना जळगाव उप विभागाची सुत्रे देण्यात आली आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment