गुप्तांग कापून, गळ्यावर वार करुन तरुणाची आत्महत्या

On: October 9, 2020 10:28 PM

नाशिक : नाशिक जिल्ह्याच्या येवला शहरातील बाजारपेठेत आज दुपारच्या वेळी एका तरुणाने कोयत्याने स्वत:चा गळा चिरुन आत्महत्या केली. तत्पुर्वी त्याने हातातील कोयत्याने स्वत:चे गुप्तांग कापले त्यानंतर गळा चिरुन आत्महत्या केली. या खळबळजनक घटनेने परिसरात खळबळ माजली होती.

मुकेश अनिल परदेशी (२५) बुंदेलपुरा, येवला जि. नाशिक असे या तरुणाचे नाव असून तो रंगकाम कारागिर असल्याची माहिती पुढे आली आहे.

या खळबळजनक घटनेच्या वेळी परिसरातील व्यापारी संकुलातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. या घटनेची माहिती मिळताच शहर पोलिस स्टेशनचे पो.नि. संदिप कोळी यांनी आपले सहकारी स.पो.नि. युवराज आठरे व कर्मचारी वर्गासह घटनास्थळ गाठले.

त्याला तात्काळ रुग्णालयात वैद्यकीय उपचारासाठी रवाना करण्यात आले. मात्र तत्पुवीच त्याची प्राणज्योत मालवली होती. डॉक्टरांनी त्याल मयत घोषीत केले. मुकेश परदेशी याने असे कृत्य का केले याचा उलगडा अद्याप होवू शकला नाही. या प्रकरणी अकस्मात मृत्युची नोंद घेण्यात आली असून पुढील तपास सुरु आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment