पोलिस बनले डिलिव्हरी बॉय आणि पिकअप केला आरोपी

On: October 10, 2020 11:47 PM

मुंबई : एखादा आरोपी पकडायचाच म्हटल्यावर कधी कधी पोलिसांना वेगवेगळ्या भुमिका देखील पार पाडाव्या लागतात. कधी शेतकरी तर कधी सेल्समन अशा विविध भुमिका बजावल्याशिवाय आरोपी जाळ्यात येत नाही. प्रसंगानुरुप पोलिस आपल्या कौशल्याच्या बळावर आरोपीला पकडून आणतात हे विविध घटनेतून पुढे आले आहे. असाच एक धोका देणारा लव्हर आरोपी पकडण्यासाठी मुंबई पोलिसांनी जेवण देण्याच्या बहाण्याने डिलीव्हरी बॉयच्या भुमिकेत जावून त्याला बंगळूरु शहरातून ताब्यात घेतले.
आरोपी मोहम्मद अनिस याने एका महिलेसोबत स्नॅप चॅट आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून जवळीक साधली होती. गोरेगाव येथे त्याने तिला लग्नाचं आमिष दाखवून तिच्यावर वारंवार बलात्कार केला होता. त्याने वेळोवेळी तिचे आक्षेपार्ह फोटो देखील काढले होते.

सुरुवातीला मैत्री, नंतर प्रेम आणि त्यापुढे जावून तिला लग्नाचं आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना मुंबईत घडली होती. या प्रकरणातील आरोपीला ताब्यात घेण्यासाठी पोलिस पथकाने सरळ डिलेव्हरी बॉयची भुमिका बजावली. जे . जे. मार्ग पोलिसांनी या प्रकरणातीला आरोपीला अटक केली आहे.

अंधेरी येथील हेल्थ क्लबमध्ये काम करणाऱ्या एका महिलेसोबत मोहम्मद अनिस उर्फ मोहम्मद शौकत या व्यक्तीने मैत्री केली. मैत्रीचे रुपांतर प्रेमात घडून आले. त्यानंतर दोघांनी मिळून एकमेकांसोबत विवाह करण्याचे ठरवले. आरोपी महिलेच्या परिवारातील सदस्यांना देखील भेटला होता. त्याने लग्न करण्याचे वचन दिले होते.

मात्र त्याने त्याचे ते वचन पुर्ण केले नाही. लग्नाचे वचन आणि आमिष दाखवून त्याने वेळोवेळी पीडितेवर बलात्कार केला. याबाबत २८ वर्षाच्या महिलेने तक्रार नोंदवली होती.
जे. जे. मार्ग पोलिसांनी सोशल मीडिया व मोबाईलच्या आधारे त्याचा शोध घेतला असता तो बंगळुरु येथे असल्याचे निष्पन्न झाले. उच्चभ्रू इमारतीत राहणा-या त्या आरोपीला नेहमी ऑनलाईन जेवण मागवण्याची सवय होती. त्या उच्चभ्रू इमारतीत प्रवेश मिळवणे कठीण होते. त्याला गाफील ठेवून एपीआय खान आणि त्यांच्या पथकाने डिलेव्हरी बॉयच्या भुमिकेत इमारतीत प्रवेश केला व त्याला ताब्यात घेतले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment