शुभेच्छारुपी प्रेमाची मिळाली सावली ; मित्रांची साथ वाढदिवसाला भावली

On: June 21, 2020 9:54 PM

नमस्कार मित्रांनो

आज माझ्या वाढदिवसाला आपण सर्वांनी विविध माध्यमाद्वारे संवाद साधत शुभेच्छा दिल्यात. आपण दिलेल्या शुभेच्छा म्हणजे आपले माझ्यावरील प्रेम कायम असल्याची पोचपावती आहे. आपले प्रेम यापुढे देखील असेच कायम राहील यात शंका नसून खात्री आहे.

कोरोना व लॉकडाऊन काळात गोरगरीबांना शिदोरी देवून भुक भागवणारे जैन उद्योग समुहाचे सुप्रिमो अशोकभाऊ जैन यांचा शुभेच्छा देण्यासाठी दुपारी आलेला फोन एक उर्जा देवून गेला. फोनवर त्यांचे प्रेमाचे दोन शब्द माझ्यासाठी लाख मोलाचे होते. त्यासोबतच त्यांचे सहकारी अनिल जोशी यांनी आस्थेवाईकपणे केलेली चौकशीदेखील माझ्यासाठी मोलाची ठरली.

जेष्ठ बंधू अ‍ॅड.नितीन खरे, परम मित्र नरेंद्र कदम यांच्यासह विविध मान्यवर तथा मित्रांच्या शुभेच्छा माझ्यासाठी आज अनमोल ठरल्या.

पुनश्च सर्वांचे धन्यवाद

आपला

ललित खरे

जळगाव

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment