भाजपा नेते आशिष शेलार यांना धमकी – दोघांना अटक

On: October 13, 2020 7:17 PM

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व रा.कॉ. चे सर्वेसर्वा शरद पवार यांना मिळालेल्या धमकीचे प्रकरण ताजे असतांनाच आता भाजपचे नेते आशिष शेलार यांना देखील धमकीचे फोन आले आहे. या प्रकरणी दोघांना मुंब्रा येथून अटक करण्यात आली आहे.

भाजपाचे आमदार आशिष शेलार यांना सातत्याने धमकीचे फोन येण्याचे प्रकार सुरु होते. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी दोघा दोन जणांना मुंब्रा येथून अटक केली आहे. सत्ताधारी महाविकास आघाडीच्या नेत्यांनंतर आता विरोधी पक्षातील नेत्याला देखील धमकीचे फोन आल्यामुळे राज्याच्या राजकीय क्षेत्रात खळबळ माजली आहे.

मुख्यमंत्री ठाकरे, रा.कॉ. नेते शरद पवार, गृहमंत्री अनिल देशमुख, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना गेल्या महिन्यात धमकीचे फोन आले होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment