बाबा रामदेव पडले हत्तीवरुन खाली – व्हिडीओ झाला व्हायरल

On: October 13, 2020 9:44 PM

नवी दिल्ली : सध्या व्हाटस अ‍ॅपचा जमाना असल्यामुळे काही क्षणात इकडची बातमी तिकडे जाण्यास वेळ लागत नाही. “फास्टर दॅन बुलेट” असा प्रकार व्हाटस अ‍ॅप मुळे घडून येतो.

बाबा रामदेव हत्तीवर बसून आपल्या संतांना योगासने करुन दाखवत होते तसेच ते योगासनाचे महत्व देखील समजावून सांगत होते. त्यावेळी अचानक हत्तीने हालचाल केल्यामुळे बाबा रामदेव खाली पडले. त्यात त्यांना किरकोळ दुखापत झाल्याचे सांगण्यत येत आहे.

व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ सोमवारचा असल्याचे सांगण्यत येत आहे. ते मथुरा येथील महावन रामानरती येथील कार्ष्णि गुरु शरणानंद महाराजांच्या आश्रमात योगासने शिकवत होते.

यावेळी बाबांनी थेट हत्तीवर बसून योगासने करण्यास सुरुवात केली. या प्रसंगाचा व्हायरल झालेला व्हिडीओ 22 सेकंदाचा आहे. यात बाबा रामदेव हत्तीवर बसून योगासने करतांना दिसतात. अचानक हत्तीने हालचाल करताच बाबा रामदेव यांचा तोल गेला आणि ते जमीनीवर पडले. त्यांना गंभीर दुखापत झाली नसल्याचे सांगीतले जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment