पोलिस अधिका-यांच्या बदल्यांचा मुहुर्त दस-यानंतर? प्रतिक्षा सुरुच

मुंबई : पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा घोळ अजुन सुरुच आहे. बदल्यांसाठी पाचव्यांदा मुदतवाढ मिळाली आहे. आता बदल्यांच्या मुदतवाढीचा कालावधी ऑक्टोबर अखेर पर्यंत लांबणीवर टाकण्यात आला आहे. त्यामुळे “दसरा” झाल्यानंतरच बदल्यांचा विषय मार्गी लागण्याची शक्यता पोलिस दलात वर्तवली जात आहे.

गृह विभागाकडील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सुमारे ८५ % बदल्या व बढत्यांचे काम पुर्ण झाले आहे. मात्र निरीक्षक व उपअधीक्षक दर्जाच्या अधिका-यांच्या पदोन्नतीचे काम गेल्या पावणेदोन वर्षांपासून रखडत पडले आहे.

महासंचालक स्तरावरील उपनिरीक्षक ते निरीक्षक दर्जाच्या बदल्यांचा कधी मुहूर्त लागतो याकडे अधिकारी वर्गाचे लक्ष लागून आहे. राज्याचे पोलीस महासंचालक सुबोध जायसवाल यांनी या बदल्यांबाबत याविषयी स्पष्ट केलेले नाही. मुदत उलटून गेली तरी आयुक्तालय, परिक्षेत्र व अधीक्षक कार्यालयातील अनेक अधिकारी जैसे थे कार्यरत आहेत. नागपूरसह नक्षलग्रस्त व साईड ब्रँचमधील कित्येक अधिकारी बदलीच्या प्रतिक्षेत अडकून पडले आहेत. बदल्यांच्या चौथ्या वेळेच्या मुदतवाढीच्या आदेशात १५ ऑक्टोबरची डेडलाईन देण्यात आली होती.

गुरुवारी ‘डीजी गॅझेट’ निघेल अशी संबंधित अधिकारी वर्गाला अपेक्षा होती. मात्र तब्येतीच्या कारणास्तव डीजी कार्यालयात आले नसल्याचे सांगण्यात येत आहे. रात्री उशीरा ३० ऑक्टोबरपर्यंत बदल्यासांठी मुदत वाढ केल्याचे अध्यादेश गृह विभागाकडून जारी करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here