विषारी दारुचे 14 बळी – 10 अटकेत

On: October 16, 2020 11:39 AM

उज्जैन : मध्‍यप्रदेशातील उज्जैन शहरात एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. विषारी दारु प्राशन केल्यामुळे 14 जणांचा मृत्यू झाला आहे. या घटने मुळे उज्जैन परिसरात खळबळ माजली आहे. या घटनेचा तपास पोलिस करत असून अवैध दारु विक्री विरोधात सुरु करण्यात आलेल्या कारवाईत आतापर्यंत 10 आरोपींना अटक करण्यात आली आहे.

या घटनेनंतर खारा भागातील पोलीस स्टेशन प्रभारींसह चौघा पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे.

उज्जैन शहरात दोघा जणांचा मृतदेह आढळून आला. या मृतदेहांची माहिती समजताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. अन्य दोघा जणांचा देखील अशाच प्रकारे मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. हे मृत्यू विषारी दारु प्राशन केल्यामुळे झाल्याचे उघड झाले. मयतांच्या शरीरात विषारी घटक आढळून आल्यामुळे या घटनेची मुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेतली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment