पोलीस स्टेशन आवारातून डंपर चोरी प्रकरणी गुन्हा

On: October 19, 2020 7:11 PM

जळगाव : महसूल खात्याने पकडून एमआयडीसी पोलिस स्टेशन आवारात लावलेले वाळूचे डंपर गायब झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध आज रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आव्हाणे येथील तलाठी मनोहर श्रीराम बाविस्कर तसेच ममुराबाद येथील तलाठी विरेंद्र पालवे यांनी गेल्या २२ जूनच्या रात्री तालुक्यातील विटनेर येथून भूषण मंगल धनगर (वैजनाथ ता.एरंडोल) याच्या ताब्यातील अवैध वाळूचे डंपर (एमएच ४६ एएफ ३७६४) पकडून ताब्यात घेत त्याच्यावर रितसर दंडात्मक कारवाई केली होती.

महसुल विभागाने ताब्यात घेतलेले हे डंपर एमआयडीसी पोलिस स्टेशनला आणून जमा केले होते. त्याबाबत तशी नोंद घेण्यात आली होती. दरम्यान रविवारच्या दिवशी हे डंपर गायब झाल्याचा प्र्कार उघडकीस आला. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला अज्ञात चोराविरुद्ध रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment