दुचाकीचोर एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात

On: October 21, 2020 10:01 PM

जळगाव : चोरी, विनयभंग व दारुचे जवळपास सोळा गुन्हे दाखल असलेल्या हतनुर ता. भुसावळ येथील संतोष रघुनाथ चौधरी (२७) यास एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याने जळगाव शहरातून दुचाकींची चोरी केल्याचे उघड झाले आहे. त्याच्या ताब्यातून दोन महागड्या दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत.

एमआयडीसी हद्दीतील काशिनाथ हॉटेल येथे अजय शालीक ब्राम्हणे हा तरुण जेवण करण्यासाठी १९ ऑक्टोबर रोजी आला होता. दरम्यान त्याच्या ताब्यातील दुचाकी (एमएच १९ बी ५५८६) दुपारी ४.३० वाजता हॉटलेच्या बाहेर लावलेली त्याची दुचाकी चोरी झाली होती.ताब्यात घेतले आहे.

ब्राम्हणे याने या प्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल केला होता. तपासात पोलिसांनी संतोष रघुनाथ चौधरी याला अटक केली आहे. संतोष याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. मात्र त्याच्याकडे ब्राम्हणे यांच्या दुचाकी ऐवजी दुसरी दुचाकी मिळुन आली आहे. ही दुचाकी देखील त्याने चोरी केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

संतोष याच्याविरुद्ध वरणगाव पोलिस स्टेशनला अवैध मद्यविक्री, चोरी, विनयभंग या सारखे १६ गुन्हे नोंद आहेत. एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक विनायक लोकरे, उपनिरीक्षक रामकृष्ण पाटील, अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, मिलींद सोनवणे, हेमंत कळसकर, विजय बावस्कर, चंद्राकांत पाटील, सचिन पाटील, योगेश बारी, होमगार्ड विजय कोळी, प्रशांत पाटील यांच्या पथकाने संतोष यास अटक केली आहे. त्याला बुधवारी न्यायालयात हजर केले. त्याला २३ ऑक्टोबर पर्यंत पोलिस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment