राखी सावंतच्या मैत्रीणीसह अभिनेत्रींच्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

On: October 24, 2020 11:55 AM

मुंबई : मुंबई येथील एका सेक्स रॅकेटचा पोलिसांनी वेशांतर करुन पर्दाफाश केला आहे. यामध्ये पोलिसांनी बेली डान्सरसह दोघा छोट्या पडद्यावरील अभिनेत्रींना ताब्यात घेतले आहे. एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये मालिकांमधे काम करणा-या अभिनेत्रींचा 10 लाख रुपयात सौदा केला जात होता. त्याचवेळी पोलिसांनी छापा टाकून त्यांना ताब्यात घेतले आहे.

गोरेगाव येथील फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये पोलिसांनी वेशांतर करुन ग्राहकाच्या रुपात जावून सापळा रचून सुरु असलेले सेक्स रॅकेट केलं उघडकीस आणण्याकामी यश मिळवले आहे. देह व्यापार करणा-या आरोपींविरोधात रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अभिनेत्री राखी सावंतची मैत्रिण असलेल्या बॉलिवूड अभिनेत्रीसह तीन तरुणींना ताब्यात घेण्यात आले आहे. शुक्रवारी मध्यरात्री गुन्हे शाखेच्या पथकाने सदर कारवाई केली. राखी सावंतची अभिनेत्री असलेली मैत्रिण या छाप्यात सापडल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment