जळगाव : भुसावळ येथील डॉ. स्वप्नील कोळंबे यांच्या दवाखान्यात जावून वारंवार दरमहा पन्नास हजार रुपयांची खंडणी मागणा-या मुख्य कुख्यात आरोपीस अटक करण्यात आली आहे. आज भल्या पहाटे एक वाजता त्याला फैजपूर – सावदा दरम्यान ताब्यात घेण्यात पोलिस पथकाला यश आले.
डॉ.स्वप्नील राजाराम कोळंबे यांचा भुसावळ शहरातील जामनेर रस्त्यालगत दवाखाना आहे. त्यांना वारंवार खंडणी मागण्याचा प्रकार सुरु होता. याबाबत त्यांनी भुसावळ बाजारपेठ पोलिसात भाग 5 गु. र. न. 901/20 भा.द.वि. 387, 504, 506, 507, 34,आर्म अँक्ट 3/25,4/25 प्रमाणे गुन्हा दाखल केला होता.
या गुन्ह्यातील मुख्य आरोपीस पो.नि. दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने भल्या पहाटे अटक करण्यात यश मिळवले. पोलिस उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाघचौरे व पो.नि. दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि अनिल मोरे, स.पो.नि मंगेश गोटला, पोलिस नाईक रविंद्र बि-हाडे, रमन सुरळकर, उमाकांत पाटील, समाधान पाटील, किशोर महाजन, पो.कॉ. विकास सातदिवे, ईश्वर भालेराव, प्रशांत परदेशी, कृष्णा देशमुख, चेतन ढाकणे, सचिन चौधरी, योगेश महाजन, सुभाष साबळे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.