अल्पवयीन मुलींची छेडखानी करणारा पोलिसांच्या ताब्यात

On: October 26, 2020 10:50 PM

जळगाव : अल्पवयीन मुलींची छेडखानी करणा-या आरोपीस भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेत अटक केली आहे. भुसावळ बाजारपेठ पोलिस स्टेशनला या प्रकरणी गु.र.न. 903/20 भा.द.वि. 354 – अ, बालकांचे लैगींक अपराधांपासुन संरक्षण अधिनियम 2012 कलम – 8 नुसार 22 ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्यातील आरोपी कैफ खान सलीम खान उर्फ कानपुरी (18) नसरवनजी फाईल, सैलानी बाबा दर्ग्याजवळ भुसावळ यास चाळीसगाव शहर परिसरातून शिताफीने सापळा रचून ताब्यात घेण्यात आले आहे.

पो.नि. दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि.अनिल मोरे, स.पो.नि.मंगेश गोटला, पोलिस नाईक समाधान पाटील, रमण सुरळकर, किशोर महाजन, उमाकांत पाटील, पो.कॉ. विकास सातदिवे, ईश्वर भालेराव, प्रशांत परदेशी, कृष्णा देशमुख, सचिन चौधरी, चेतन ढाकणे, योगेश महाजन, सुभाष साबळे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

पुढील तपास स.पो.नि.अनिल मोरे, पोलिस नाईक समाधान पाटील करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment