भुसावळ शहरातील चाकूहल्ला प्रकरणी गुन्हा दाखल

On: November 4, 2020 10:41 AM

जळगाव : भुसावळ येथील कालिका माता मंदिरानजीक खेडी रस्त्यावर काल रात्री झालेल्या चाकू हल्ल्याप्रकरणी आज सकाळी बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. चौघांनी काल रात्री नऊ वाजता खेडी बुद्रुक येथील ऑटो मॅकेनिकवर चाकूहल्ला केला. या घटनेनंतर चौघे हल्लेखोर पसार झाले.

वैभव राजू महाजन (19) हे ऑटो गॅरेज मॅकेनिक असून खेडी बुद्रुक येथे राहतात. 3 नोव्हेंबरच्या रात्री नऊ वाजता ते घरी जात असतांना दोन दुचाकीवरुन आलेल्या चौघांनी त्यांना मारहाण करत चाकू हल्ला केला.

या घटनेनंतर वैभव महाजन यांच्या जवळ असलेले पाच हजार रुपये हिसकावुन घेत पळ काढला. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात भाग-5 गु.र.न. 926/20 भा.द.वि. 394, 504, 506, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment