दुचाकी पार्किंगचा वाद जिवावर बेतला

On: June 25, 2020 4:51 PM

नागपूर : दुचाकी पार्क करण्याचे क्षुल्लक कारण महिलेच्या जिवावर बेतण्याचा प्रकार नागपुर शहरातील महिलेसोबत काल घडला. या घटनेत महिलेचा चाकूने भोसकून खून करण्यात आला. संशयीत बंडू एकनाथ टापरे या तरुणाविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

आरती नितीन गिरडकर (३४) असे मयत महिलेचे नाव असून संशयीत आरोपीचे नाव बंडु उर्फ एकनाथ प्रेमराज टापरे (२९) आहे.

रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास शहरातील केडीके कॉलेज रस्त्यावरील नंदनवन झोपडपट्टी, गल्ली नं. ५ या ठिकाणी राहणारे नितीन नारायण गिरडकर (वय ४२) यांची पत्नी आरती या त्यांच्या ताब्यातील दुचाकी पार्क करत होत्या. त्यावेळी शेजारी राहणा-या बंडु उर्फ एकनाथ प्रेमराज टापरे याने त्यांना शिवीगाळ सुरु केली. त्यामुळे वाद वाढत गेला. दरम्यान संशयीत नितीन गिरडकर याने आरती यांना धारदार चाकूने भोसकले. नंदनवन पोलिस पुढील तपास करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment