आजचे राशी भविष्य (28/11/20)

मेष : व्यावसायीक चढ उताराचा दिवस राहील. योग्य संधी आणि वेळेची वाट बघावी लागेल.

वृषभ : प्रलंबीत कामे प्राधान्याने सोडवावी लागतील. कठीण वाटणारी कामे सहजतेने पार पडतील

मिथुन : महत्वाच्या निर्णयाला उशीर करुन चालणार नाही. सहका-यांसोबत जुळवून घ्यावे लागेल.

कर्क : स्वत:ला सिद्ध करण्याची क्षमता वाढेल. उद्योजकांना चांगला दिवस राहील.

सिंह : लहान मोठे प्रवास घडतील. टीका करणा-यांना योग्य उत्तर द्यावे लागेल.

कन्या : प्रतिस्पर्धी नामोहरम होतील. केवळ कामावर लक्ष केंद्रीत करावे लागेल.

तुळ : केवळ आपले हित बघून पुढील पाऊल टाकावे लागेल. अडचणीवर मात कराल.

वृश्चिक : रागावर नियंत्रण ठेवून काम करावे लागेल. समस्या निर्माण झाल्या तरी त्या सुटतील.

धनु : कला व क्रिडा क्षेत्रात नाम कमवाल. नुकसान टाळण्यासाठी प्रयत्नशील रहावे लागेल.

मकर : अनेक कामांचा निपटारा होईल. मित्रांचे सहकार्य मिळेल.

कुंभ : मन स्थिर ठेवून प्रश्न मार्गी लावावे लागतील. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.

मीन : महत्वाचा निर्णय घेताना योग्य रितीने घ्यावा लागेल. धनप्राप्तीचे नविन मार्ग मिळतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here