अनैतिक संबंधाचा संशय सावत्र बापाने केली मुलाची हत्या

On: June 29, 2020 7:06 PM

उल्हासनगर– आई आणि मुलाच्या अनैतिक संबधाच्या संशयातून सावत्र बापाने मुलाची हत्या केल्याची घटना कॅम्प नं -४ येथील व्हिनस चौक परिसरात घडली. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी  सावत्र बापाला अटक केली. उल्हासनगर कॅम्प नं -४ परिसरातील व्हिनस चौक परिसरात एक महिला आपल्या तीन मुलासह राहत होती. काही महिन्यांपासून विजय चव्हाण नावाचा इसम त्यांच्याकडे राहायला आला असून त्याने महिले सोबत लग्न केल्याचे त्याचे म्हणणे आहे. गुरुवारी सकाळी पाच वाजेच्या सुमारास २३ वर्षीय सावत्र मुलगा राजेश खरात झोपेत असताना लोखंडी सळईने त्याला जबर मारहाण केली. डोक्याला मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या प्रकाराने एकच खळबळ उडाली असून मृत राजेशच्या लहान भावाने झालेल्या प्रकाराबाबत विठ्ठलवाडी पोलिसांना माहिती दिली. विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला असून संशयीत आरोपी विजय चव्हाण याला अटक केली. अधिक चौकशी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश भामे करीत

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment