ट्रकच्या धडकेत वृद्ध ठार

On: December 10, 2020 4:01 PM

जळगाव : ट्रक मागे घेत असतांना मागे उभा असलेला वृद्ध ट्रकच्या मागील चाकाखाली येवून ठार झाल्याची घटना आज सालार नगरात घडली.

ट्रकचालक शब्बीर शरोफोददीन खाटीक (रा. तांबापुरा) हा त्याच्या ताब्यातील टाटा 407 कंपनीची ट्रक (एमएच 15 जी 4948) आज सकाळी साडे नऊ वाजेच्या सुमारास सालार नगर भागात मागे घेत होता. त्यावेळी ट्रकच्या मागे उभा असलेल्या गुलामे मुस्तफा (70) या वृद्धास ट्रकची धडक बसली. या धडकेत गुलामे मुस्तफा हा वयोवृद्ध इसम गंभीर जखमी झाला. त्यास नागरिकांनी मेहरुण परिसरातील सारा हॉस्पीटल येथे दाखल केले. डॉक्टरांनी त्यास मयत घोषीत केले.

या प्रकरणी शरिफखान अजीजखान पठाण (65) रा. दंगलग्रस्त कॉलनी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शब्बीर शरोफोद्दीन खाटीक याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिस स्टेशनला रितसर फिर्याद दाखल करण्यात आली. पुढील तपास पोलिस उप निरिक्षक विशाल सोनवणे व संदीप पाटील करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment