युवकाची गळा चिरून हत्या

On: June 29, 2020 7:06 PM

नाशिक: नाशिकरोड येथील जेलरोड भागात आज एका युवकाची अज्ञात हल्लेखोरांनी धारधार शस्त्राने गळा चिरून हत्या केल्याची घटना घडली. सायंकाळी 7.30 वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी शेवटचे वृत्त्त हाती आले तेव्हा उपनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. मयत तरुणाची ओळख पटली असून त्याचे नाव  सागर संदीप अहिरे (20 रा.शिवाजी नगर, जेलरोड) असल्याचे निष्पन्न झाले आहे.

जेलरोड भागातील दसक येथील गोदावरी नदी काठालगत असलेल्या सातआंबे भागात एक तरुण मयत अवस्थेत पडून असल्याचे एका इसमाने उप नगर पोलिस स्टेशनला कळवले होते. माहिती मिळताच उपनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील रोहोकले यांनी आपल्या सहकारी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. यावेळी मयत युवकच्या गळ्यावर तीक्ष्ण हत्याराने वार केल्याचे निदर्शनास आले. सदर घटना प्रेम प्रकरणातून झाली असल्याचे सांगण्यात येत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment