दोन वर्षात देश होणार टोलमुक्त – नितीन गडकरी

On: December 17, 2020 8:39 PM

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रस्ते वाहतुकीच्या बाबतीत एक घोषणा केली आहे. आगामी दोन वर्षांत भारताला टोल नाक्यांपासून मुक्ती मिळणार असल्याची घोषणा गडकरी यांनी केली. केंद्र सरकार रशियाच्या मदतीने ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम (जीपीएस) या तंत्रज्ञानाचा वापर केल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या टोल उत्पन्नात 5 वर्षांत 1.34 ट्रिलियनपर्यंत वाढ होणार आहे. याबाबत संबंधित विभागांची नुकतीच एक बैठक झाली आहे. या नव्या रचनेमुळे 1,34,000 कोटी रुपयांचे उत्पन्न वाढणार असल्याचे गडकरी यांनी सांगितले आहे.

गेल्या वर्षभरापासून केंद्र सरकारकडून वाहनांना फास्ट टॅगची सक्ती केली आहे. यामुळे इंधनाची बचत झाली आहे. असे असले तरी देखील बरेच जण वाहनांना फास्ट टॅग लावत नाही. कॅशलेस व्यवहारामुळे व्यवहारात पारदर्शकता येवुन भ्रष्टाचाराला आळा बसणार आहे. केवळ फास्ट टॅगमुळे सरकारी उत्पन्नात 70 कोटी रुपयांवरुन 90 कोटींपर्यंतची वाढ दिसून आली आहे. टोल नाक्यांच्या व्यवहारात प्रचंड गैर व्यवहार होत असल्याच्या तक्रारी नेहमी येत होत्या.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment