पोलिस पाटीलवर झाला गोळीबार कट्टा लॉक झाल्यामुळे वाचले प्राण

On: June 29, 2020 7:06 PM

पुणे: पुणे जिल्हयाच्या खेड तालुक्यातील वरची भांबुरवाडी येथील पोलिस पाटील वर गोळीबार झाल्याची घटना आज घडली. मात्र हल्लेखोरांच्या हातातील गावट्टी कट्टा अचानक लॉक झाल्याने पोलिस पाटील यांचे प्राण वाचले आहे.

राजगुरूनगर परिसरातील वरची भांबुरवाडी येथील पोलिस पाटील सचिन भिवसेन वाळुंज यांच्यावर आज दुपारी गोळीबाराची घटना घडली. एक फायर झाल्यावर वाळूंज यांच्या सुदैवाने हल्लेखोरांचा गावठी कट्टा लॉक झाला. कट्ट्यातून निघालेली एक गोळी वाळूंज यांच्या हाताच्या मनगटाला लागली. त्यामुळे ते जखमी झाले असून त्यांच्या हाताचे हाड फ्रॅक्चर झाले.

घटना घडल्यानंतर वाळूंज हे थेट त्याच्या चारचाकी वाहनात बसून राजगुरुनगर परिसरातील एका खाजगी दवाखान्यात आले. या घटनेची माहिती मिळताच तालुक्यातील पोलिस पाटील व मित्रपरिवाराने दवाखान्यात गर्दी केली. राजकीय वादातून ही घटना झाली असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment