जळगाव : जळगाव येथील डॉ. विजय साखला यांची सेंट्रल ह्युमन राईट ऑर्गनायझेशन न्यु दिल्ली (केंद्रीय मानव अधिकार ) जळगाव जिल्हा असिस्टंट सेक्रेटरी या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीबद्दल रुख्मिणी फाउंडेशन मिडटाऊन, व जे. सी. आय. जळगाव तर्फे अभिनंदन करण्यात आले. या नियुक्तीबद्दल मित्र परिवारातर्फे तसेच सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.