हद्दपार शम्मी चावरीयाला अटक – एलसीबीची कारवाई

On: December 23, 2020 9:15 PM

जळगाव : भुसावळ बाजारपेठ पोलिस स्टेशन हद्दीतील हद्दपार आरोपी शम्मी प्रल्हाद चावरीया (30) रा. वाल्मिक नगर भुसावळ यास पांडुरंग टॉकीज परिसरातून अटक करण्यात आली आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार अशोक महाजन, हे.कॉ. शरिफोद्दीन काझी, पोलिस नाईक युनुस रसुल, किशोर राठोड, पो.कॉ. विनोद पाटील, रणजीत जाधव, चालक इशान यांच्या पथकाने शम्मी चावरीया यास ताब्यात घेतले आहे. शम्मी चावरीया यास दोन वर्षासाठी जळगाव जिल्हयातून हद्दपार करण्यात आले होते. हद्दपार करण्यात आले असतांना तो शहरात फिरत असल्याचे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास आढळून आल्याने त्याच्या अटकेची कारवाई करण्यात आली. त्याला भुसावळ बाजारपेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment