नालासोपारा : तुळींज पोलीस स्टेशनला कार्यरत असलेल्या पोलीस हवालदाराने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना आज 24 डिसेंबरच्या सकाळी घडली. पहाटेच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. पोलिस निरिक्षकांच्या दालनातच हा आत्महत्येचा प्रकार घडला आहे.
सखाराम भोये (42) असे आत्महत्या केलेल्या पोलिस हवालदाराचे नाव असून या आत्महत्येच्या घटनेमागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आत्महत्या करणारा सखाराम भोये हा कर्मचारी गेल्या चार वर्षापासून पालघर जिह्यातील तुळींज पोलीस स्टेशनला कार्यरत होता.






