प्रवासी भाड्याच्या वादातून जिवघेणा हल्ला

On: June 29, 2020 7:30 PM

मुंबई: सायन रुग्णालयाबाहेर प्रवासी घेण्याच्या वाद चिघळल्याने दोघा टॅक्सी चालकात जोरदार हाणामारी झाली होती. या हाणामारीत एका टॅक्सी चालकावर दुस-याने जिवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात जखमी टॅक्सी चालकाच्या भावाने सायन पोलिसात रितसर गुन्हा दाखल केला.

याप्रकरणी जखमी टॅक्सी चालक जुबेर हुसेन खान (28) याच्या भावाने दिलेल्या तक्रारीनुसार शाहरुख चौधरी याच्या विरुद्ध हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शाहरुखने बियरची फुटलेली बाटली जुबेरच्या पोटात मारल्याने तो तो गंभीर जखमी झाला. त्याची प्रकृती चिंताजनक असून, अतिदक्षता विभागात त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment