आजचे राशी भविष्य (28/12/20)

मेष : तब्येतीत सुधारणा होवून फरक जाणवेल. विद्यार्थ्यांना शिक्षणात चांगले यश मिळेल.

वृषभ : आपल्या बोलण्यातील एखादी चुक महाग पडू शकते. कुणावर पटकन विश्वास ठेवू नका.

मिथुन : कामाचा व्याप वाढल्याने धावपळ होईल. बेरोजगारांना नोकरी मिळण्याची शक्यता.

कर्क : बुद्धीचा कस लागेल. हुशारीने प्रश्न सोडवावे लागतील. आर्थिक लाभ संभवतो.

सिंह : घरगुती समस्या संयमाने सुटतील. कर्ज प्रकरण मार्गी लागण्याची शक्यता.

कन्या : परदेशी जाणा-यांचे मार्ग प्रशस्त होतील. समाधानकारक दिवस जाईल.

तुळ : मुलांची प्रगती बघून आनंद वाटेल. व्यावसायीकांना चांगला दिवस राहील.

वृश्चिक : एखाद्या गोष्टीने मनस्ताप होवू शकतो. निर्णय घेतांना डोके शांत ठेवावे लागेल.

धनू : न्यायालयीन कामकाजात यश मिळेल. कुणाला वचन देवू नका.

मकर : आर्थिक आवक काही प्रमाणात कमी होईल. मात्र समस्या मार्गी लागतील.

कुंभ : महिलांना माहेरी जाण्याचे योग जुळून येतील. वडीलधारी माणसे आपल्यावर समाधानी राहतील.

मीन : कुणाकडून भेटवस्तू मिळण्याची शक्यता. लहान मोठे प्रवासाचे योग आहेत.  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here