मुंबई डब्बेवाला संघटनेचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांना अटक

On: January 5, 2021 3:44 PM

मुंबई : मुंबई डब्बेवाला संघटनेचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांना घाटकोपर पोलिसांनी अटक केली आहे. डब्बेवाल्यांना मोफत दुचाकी देण्याचे आमीष दाखवून फसवणुक केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी घाटकोपर पोलिसांनी तळेकर यांना अटक केली आहे.

गेल्या वर्षी फेब्रुवारी 2020 मध्ये घाटकोपर पोलीस स्टेशनला याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. विशेष म्हणजे मुंबईच्या डब्बेवाल्यांनीच हा गुन्हा दाखल केला होता. सुभाष तळेकर मुंबई डब्बेवाला संघटनेचे पदाधिकारी असताना त्यांनी दुचाकी मोफत देण्याच्या नावाखाली डब्बेवाल्यांकडून काही कागदपत्रे घेतली होती. मात्र नंतर डब्बेवाल्यांना दुचाकी उत्पादक, विक्रेत्या कंपन्यांकडून कर्जाच्या हफ्त्याबाबत फोन येऊ लागले. तसेच कर्ज वसुलीसाठी त्यांना पतपेढ्यांकडून देखील फोन येऊ लागले. डब्बेवाल्यांची कागदपत्रे घेऊन त्यांच्या नावे कर्ज काढण्यात आल्याने त्यांना हे फोन येत होते.

काहींनी कर्जाचे हप्ते देखील भरले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर डब्बेवाल्यांनी आणखी चौघा जणांविरुद्ध भा. दं. वि. कलम 420 नुसार गुन्हा दाखल केला होता.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment