गंभीर गुन्हा करण्याच्या तयारीतील तरुण तलवारीसह अटकेत

On: January 5, 2021 7:19 PM

जळगाव : गंभीर गुन्हा करण्याच्या तयारीत असलेल्या तरुणास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धारदार तलवारीसह आसोदा गावातील डांगरवाडा भागातून ताब्यात घेत अटक केली आहे. अशोक चौधरी असे अटकेतील तरुणाचे नाव असून त्याच्या ताब्यातून पिवळ्या रंगाची धातूची मुठ असलेली धारदार तलवार म्यानेसह ताब्यात घेण्यात आली.

स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ. विजयसिंग पाटील, जितेंद्र पाटील, राहुल पाटील, नितीन बाविस्कर, प्रितम पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली. अटकेतील अशोक चौधरी याच्या विरुद्ध आर्म अ‍ॅक्ट 4/25 नुसार तालुका पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment