नाशिकला अल्पवयीन मुलीवर सामुहिक अत्याचार

On: January 10, 2021 6:40 PM

नाशिक : नाशिक रोड हद्दीत सहा संशयीतांनी तेरा वर्षाच्या बालिकेवर सामुहीक अत्याचार केल्याची घटना आज उघडकीस आली. सदर घटना काल शनिवारी सायंकाळी घडली आहे. या घटनेने नाशकात खळबळ माजली आहे. या घटनेत एका संशयीत महिलेसह पाच युवक आणी एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. या प्रकरणी सात जणांविरुद्ध बलात्कारासह बाल लैंगीक अत्याचार कायद्यानुसार नाशिक रोड पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.

नाशिक रोड पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या अरिंगळे मळा परिसरात सहा संशयितांनी एका 14 ते 16 वर्ष वयोगटातील बालिकेवर सामुहीक अत्याचार केल्याची घटना शनिवार दि. 9 जानेवारीच्या सायंकाळी घडली. सदर घटनेबाबत पिडीत बालिकेने तिच्या आईला कथन केली. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

वरिष्ठ पोलीस निरिक्षक सुरज बिजली यांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर लागलीच तपासाची चक्रे वेगाने फिरवत सात जणांना अटक केली. त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना शनीवार 16 जानेवारी पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment